विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात; अंकिताला राग अनावर; रिअॅक्शन होतेयं व्हायरल

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन दोघेही ‘बिग बॉस १७’मुळे चांगलेच चर्चेत राहिले आहे. यानंतरही त्यांनी एकत्र अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. नुकतेच अंकिता आणि विकीने एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी विकीने अंकितासमोर दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात हातात धरला होता. जे पाहून अंकिता चिडली असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन ‘फौजी २’च्या इव्हेंटमध्ये आले होते. यावेळी मनोज वाजपेयी, गौहर खान, मीरा चोप्रा देखील होते. व्हिडिओमध्ये विकी मीराचा हात पकडून तिच्याशी काहीतरी बोलताना दिसतोय. याचवेळी बाजूला उभी असलेली अंकिता हे सगळे पाहत असते आणि तिची नाराजीचा स्पष्टपणे दिसते.
जेव्हा विकी अंकिताच्या बाजूला जातो तेव्हा अंकिता त्याला ‘काय?’ असं इशारा करते. तेव्हा विकी तिला काहीतरी उत्तर देतो. मात्र ती रागारागानेच मीराकडे पाहते. अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Ankita Lokhande |
View this post on Instagram
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. ‘अंकिता म्हणत असेल, घरी चल मग दाखवते’, ‘विकीने का हात धरलाय?’,’विकी पत्नीचा सोडून बाकी प्रत्येक अभिनेत्रीसोबत फ्रेंडली होतो’, ‘अंकिताबद्दल वाईट वाटतंय, तिला काय हवं होतं आणि काय मिळालंय’, ‘विकी मीराला काहीतरी गंभीर सांगत आहे, पण अंकिता ही अंकिता आहे ती तशीच वागणार.’
तर एका व्यक्तीने अंकिताला चुकीचे ठरवत लिहिले, “मीराच्या काकांचा (मन्नाराच्या वडिलांचा) नुकताच मृत्यू झाला होता, त्याबद्दलच विकी सहानुभूती व्यक्त करत असावा, पण अंकिताला नेहमीच मत्सरच वाटतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “बिचारा आता कोणाशी बोलूही शकत नाही.” या व्हिडिओनंतर अंकिता आणि विकीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. Ankita Lokhande |
हेही वाचा:





