ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीविषयी आली ‘ही’ महत्वाची माहिती समोर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांना शूटिंगदरम्यान पाठीचा स्नायू खेचला गेल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अभिनेता धर्मेंद्र यांना शूटिंग दरम्यान पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झल्यानंतर रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याविषयीची माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
Friends, i have learnt the lesson 🙏 pic.twitter.com/F6u8mtnTUl
— Dharmendra Deol (@aapkadharam) May 1, 2022
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी आता ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला त्यांनी “मित्रांनो, मी धडा शिकलो आहे, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे तसेच यात ते एकदम फिट असल्याचे दिसत असून त्यांनी त्यांच्या पाठीच्या दुखण्याविषयी माहिती दिली आहे. तसेच आपण रुग्णालयात असताना आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वच चाहत्यांचे त्यांनी आभार देखील मानले आहेत.
आगामी काळात धर्मेंद्र ती २००७ मध्ये आलेला त्यांचा अपने या सिनेमाच्या सिक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.





