मुंबई – व्हेस्पा या इटालियन कंपनीने भारतातील कारभाराची सुरुवात बरोबर 75 वर्षांपूर्वी केली होती. आता भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कंपनीने भारतातील आपले अस्तित्व आणखी वृद्धिंगत करण्याचे ठरविले आहे.
वेस्पा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आम्ही एक वेगळी गाडी भारतीय नागरिकांना सादर केली आहे. कंपनीने भारतामध्ये आपले वितरण बळकट करण्याचे ठरविले असून आगामी काळामध्ये आणखी 3000 डीलरशिप उघडण्यात येणार आहेत.
कंपनीचे बारामती येथे उत्पादन केंद्र आहे. आगामी काळात भारतातील वाढती मागणी लक्षात घेता उत्पादन वाढविण्याची शक्यता खुली ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक दर्जाची डिझाइन असलेल्या व्हेस्पा कंपनीच्या उत्पादनांना भारतीय नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आगामी काळात आम्ही मेक ईन इंडियावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात स्कूटरची बाजारपेठ गेल्या दहा वर्षात वेगाने विस्तारली आहे, त्यामुळे या बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी नवी उत्पादने उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.