महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब : पर्यटक लुटतायत पावसाचा आनंद
Updated On:

पाचगणी : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढला असताना राज्याचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकुळ पाहायला मिळत आहे . मात्र महाबळेश्वरात पडणाऱ्या धोधो पावसात निसर्गाच विलोभनीय दृश्य पाहण्याकरीता पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाबळेश्वरचा पाऊस म्हणजे नेहमी पर्यटकांना आकर्षित करतो. सह्याद्रीच्या कडेकपारीतुन वाहनारे नयनरम्य झरे पर्यटकांना इथल्या निर्सगाच्या प्रेमात पाडायला भाग पडतात. त्यातच महाबळेश्वरचा वेण्णालेकही ओसंडून वाहत आहे.
वेण्णालेकवर पाऊस आणि धुक्याचा पाठशिवनीचा खेळ पर्यटकांना मत्रमुग्ध करत आहे. भर पावसात धुक्याची दुलई येत आल्याचे पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. पावसाच्या आनंद लुटत इथे पर्यटक कणीस, गरम गरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.





