आक्या बॉन्ड टोळीकडून वाहनांची तोडफोड
Updated On:

पिंपरी- अनिकेत रणदिवे यांच्या खुनामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीने वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी घरकुल, चिखली येथे घडली.
आक्या बॉन्ड टोळी आणि अमित चव्हाण टोळी यांच्यात घरकुल परिसरातील वर्चस्वावरून वाद आहेत. याच वादातून 15 मे रोजीची अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला झाला. या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड टोळीतील अनिकेत रणदिवे यांचा शुक्रवारी (दि. 29) चव्हाण टोळीकडून खून करण्यात आला.
अनिकेत रणदिवे याच्या खूनामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीने आरोपी राहात असलेल्या घरकुल चिखली येथील इमारतीच्या परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घरकुल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे घरकुल परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





