मुंबईत भाज्यांची दरवाढ
Updated On:

मुंबई – मुंबईमध्ये भाजीचे दर गगनाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे.
भेंडी, गवारने जवळपास शंभरी गाठली आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ झालेली आहे, अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली आहे. +
या संपूर्ण भाववाढीचा परिणाम भाजी व्यवसायावरती होत असल्याने खूप मोठा तोटा भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक महाग भाज्या घेणे टाळत आहेत. त्यामध्येही भेंडी आणि गवार यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने ग्राहक भेंडी आणि गवार खरेदी करणे टाळत आहेत.





