Vasubaras : पडस्थळ मारकड वाड्यावर वसुबारसचा थाट ; सरपंच वैशाली मारकड यांच्या हस्ते खिल्लार गायीचे पूजन

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथे दीपावली सणाची सुरुवात होत असलेल्या शुक्रवारी (दि. 17) वसुबारस या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध असणार्या मारकड वाड्यावर प्रथेप्रमाणे खिल्लार गायींचे पूजन करत गोड घास भरवत, गावच्या सरपंच वैशाली मारकड तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड कुटुंबीयांनी वसुबारस उत्साहात साजरी केली.पडस्थळ गावात प्रत्येक कुटुंब गायीची मनोभावे पूजा करतात. तिला छान सजवले जाते. तिला देवीस्वरूप मानून नैवैद्य दाखवला जातो.
घरोघरी या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाची आराधना केली जाते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे वसुबारस या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, अशी प्रतिक्रिया गावच्या सरपंच वैशाली मारकड यांनी पत्रकारांना दिली. आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, व आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, शेतीला आपल्या शेनाद्वारे खत देऊन, पौष्टिकत्व आणणार्या गाईची सेवा व पालन प्रत्येक शेतकरी कुटुंबाने करावे. यावेळी मारकड परिवारातील पवनकुमार मारकड, अमर मारकड, देवरथ मारकड, हनुमंत मारकड, तुळशीराम मारकड, अजिनाथ मारकड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





