Varun Dhawan : दसऱ्याच्या मुहूर्तावर बॅाक्स अॅाफिसवर अभिनेता वरुण धवण याची मुख्य भूमिका असलेला ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री जान्हवी कपूर होती. पण सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. या सिनेमाला कांतारा सिनेमामुळे मोठा फटका बसला. अशातच आता वरुणने नो एॅन्ट्री २ सिनेमातून एक्सिट घेतली आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘नो एन्ट्री’ सिनेमाला मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. यानंतर आता या सिनेमाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरूवात झाली आहे. आता नो एन्ट्री २ सिनेमातील कास्ट समोर आली आहे. या कास्टमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. पण वरुणने या सिनेमातून एक्सिट घेतली आहे. वरुण धवनचा भेडिया २ हा सिनेमा देखील अॅानफ्लोअर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनचा आगामी ‘भेडिया 2’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगमध्ये वरुण व्यस्त आहे. या दोन्ही सिनेमांच्या एकसारख्या तारखांमुळे त्याने मोठा निर्णय घेत नो एन्ट्रीमधून एक्सिट घेतली आहे. मात्र, अद्यापर्यंत यावर वरुन धवन किंवा सिनेमाच्या टीमकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वरुण धवनच्या ऐवजी आता नो एन्ट्री २ मध्ये कोणत्या अभिनेत्याला कास्ट केले जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा सिनेमा २ अॅाक्टोबरला बॅाक्स अॅाफिसवर प्रदर्शित झाला. या सिनेमात वरुण धवनसोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनमाने बॅाक्स अॅाफिसवर आतापर्यंत अवघे 49.60 कोटी रुपये गोळा करण्यात यश मिळवले आहे. हेही वाचा : न्यूयॉर्क ते दिल्ली, प्रियांका चोप्रा मायदेशी परतली! ‘या’ सिनेमाचे शुटिंग करणार पूर्ण