Varun Dhawan | अभिनेता वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये केवळ वरुणच नाही तर जॅकी श्रॉफ देखील धमाका करताना दिसणार आहे. वरुण धवन रुपेरी पडद्यावर जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. अॅटलीने या सिनेमाची निर्मिती केली आहे. निर्मात्यांनी खरी ख्रिसमस भेट सलमान खानच्या माध्यमातून दिली आहे. या ट्रेलरमध्ये वरुणने यापूर्वीच्या कोणत्याही चित्रपटात केली नसलेली हिंसा, रक्तपात आणि तुफानी ॲक्शन केली आहे. बेबी जॉन एक पोलिस आहे ज्याच्यासोबत जॅकी श्रॉफ या भयानक खलनायकाने काहीतरी वाईट केले आहे. ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की त्याच्या कुटुंबात एक अपघात घडतो, ज्यामुळे तो अधिक हिंसक होतो. Varun Dhawan | जॅकी श्रॉफच्या लूकमध्ये एक वेगळीच आश्चर्यकारक भर पडली आहे. जॅकीने तो किती अष्टपैलू आहे हे सिद्ध केले. सिंघम अगेननंतर, बेबी जॉनमध्ये तो दुस-यांदा खलनायकी अवतारात दिसला आहे, जो चाहत्यांच्या हृदयावर छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय वामिका गब्बी, कीर्ती सुरेश आणि सान्या मल्होत्रा ह्या देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. Varun Dhawan | पण ट्रेलरचा सरप्राईज फॅक्टर म्हणजे सलमान खानचा कॅमिओ, जो शेवटच्या दोन सेकंदात दिसत आहे आणि तोही पूर्णपणे नाही. यात केवळ सलमानचे डोळे दिसत आहे. हा सरप्राईज फॅक्टर चित्रपटासाठी अप्रतिम ठरू शकतो. हा चित्रपट 25 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा: फक्त 4 दिवस बाकी ! आधारशी संबंधित ‘या’ कामासाठी तुमच्या खिशाला लागणार कात्री ; लवकर आटोपून घ्या ‘हे’ काम