Varun Dhawan : वरुण धवनने चाहत्यांना दिली गुड न्यूज! आलिशान घरानंतर आता विकत घेतले शेत म्हणाला…
Varun Dhawan : चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेताना वरुणचा साधा आणि रिलॅक्स अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपल्या चाहत्यांना एक खास आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वरुणने आपण शेत खरेदी केल्याची माहिती दिली. ही खरेदी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचेही त्याने सांगितले.
वरुणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या नव्या फार्मवर निवांत वेळ घालवताना दिसत आहे. चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेताना वरुणचा साधा आणि रिलॅक्स अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आजूबाजूचे शांत वातावरण आणि आल्हाददायक हवामानामुळे हा व्हिडिओ आणखी खास झाला आहे.
व्हिडिओ शेअर करताना वरुणने “मी एक शेत विकत घेतले आहे,” असे सांगितले. तसेच ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे त्याने म्हटले. वरुणच्या या खास पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
वरुणने शेताचे ठिकाण, त्यासाठी मोजलेली रक्कम आणि नेमकी किती जमीन खरेदी केली आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, त्याच्या व्हिडिओवरून ही मालमत्ता त्याच्यासाठी केवळ गुंतवणूक नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची असल्याचे दिसून येते.
मुंबईसारख्या धावपळीच्या शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तसेच कुटुंबासोबत निवांत क्षण अनुभवण्यासाठी हे शेत त्याच्यासाठी खास ठिकाण ठरू शकते. दरम्यान, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल अलीकडेच मुंबईतील जुहू परिसरातील मालमत्ता खरेदीमुळे चर्चेत आले होते.
मुंबईत आलिशान अपार्टमेंट खरेदी
रिपोर्ट्सनुसार, या दोघांनी जवळपास ४४.५२ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. याच प्रोजेक्टमध्ये वरुणने त्याची आई करुणा धवन यांच्यासोबत आणखी एक मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले होते. या मालमत्तेची किंमत सुमारे ४२.४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. दोन्ही व्यवहारांची एकत्रित किंमत जवळपास ८६.९२ कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
Nevase News : जेऊर हैबती गावात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण






