वरून धवननं केलं खास अंदाजात ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांचं स्वागत

मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इवांका यांच्या सोबत काल (दि. २४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, याच पार्शवभूमीवर बॉलिवूड अभिनेता ‘वरून धवन’ याने ट्रम्प यांच्या स्वागतासाठीचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडिओत आपण पाहू शकतो कि, वरुण धवन डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बोलत आहे. ट्रम्प यांचं स्वागत करण्याबद्दलही तो भाष्य करताना दिसत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये वरून अनेक कॉमेडी डायलॉग बोलताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.





