Bigg Boss Marathi 5: निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये पुन्हा राडा; निक्कीने थेट अक्कलच काढली, पाहा Video

Bigg Boss Marathi 5 | Varsha Usgaonkar | Nikki Tamboli – जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”… कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सर्वच पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा यंदाच्या सीजनाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या.
मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. बिग बॉस म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणाऱ्यांची जत्रा.. इथे साळसूद किंवा नॉन ग्लॅमरस माणसांना अजिबात एन्ट्री मिळत नाही… इथे तुम्ही जितके डँबिस… तितके हिट… असंही समीकरण आहे.
यंदाच्या सिजनला एकदम जोरदार पद्धतीने सुरुवात झाली असून, ‘बिग बॉस मराठी 5’ला अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. या शोचा ग्रँड प्रीमियर 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता पडला असून, सर्व स्पर्धक ‘बीबी’च्या घरामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता हे घर पुढचे शंभर दिवस मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. पुन्हा एकदा मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही तुम्हाला या घरात पाहायला मिळणार आहे.
‘बीब’च्या घरात पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वाद झाला आहे. दरम्यान वर्षा उसगांवकर यांच्या चुकीमुळे घरातल्या इतर सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस घरातल्या सदस्यांना सांगतात की, बेडचा वापर करण्याची आता परवानी नाही. म्हणून आता घरातल्या सगळ्या सदस्यांना जमिनीवर त्यावर निक्की वर्षा उसगांवकर यांच्यावर भडकते. त्याचप्रमाणे त्या देखील तिच्यावर चांगल्याच वैतागतात. त्यामुळे आता वर्षा उसगांवकर यांच्या कोणत्या चुकीमुळे घरातल्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय.
त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा. असं या प्रोमो मध्ये दिसत आहे.





