विजयानंतर वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या…

Varsha Gaikwad | लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधी आघाडीच्या इंडिया ब्लॉकला 234 जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहे. अशात ते बहुमताच्या (272) अंकाच्या खूप मागे आहे. त्यामुळे त्यांना मित्रपक्षाची साथ लागणार आहे.
महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपा उमेदवार उज्ज्वल निकम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला होता. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ? Varsha Gaikwad |
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, दौरे केले, त्यांनी जे जनतेला आवाहन केले होते, त्याप्रती त्यांना आम्ही भेटायला आलो. त्यांनी सांगितले होते की, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या, तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली,” असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रात, मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम केले, त्यांचा परिणाम आम्हाला घवघवीत यश मिळाले. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटायला आले आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे. येणाऱ्या विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार आहोत,” असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. Varsha Gaikwad |
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी “मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार आहे. वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, माझ्या बहिणीसाठी माझे मत पहिल्यांदाच काँग्रेसला देणार आहे”, असे म्हंटले होते. दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांचा १६ हजार ५१४ मतांनी विजय झाला त्यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली. तर उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार ३१ मते मिळाली.
हेही वाचा:




