“युतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर…” ; संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला काँग्रेसकडून प्रत्युत्तर

Varsha Gaikwad । राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत काँग्रेसमुळे बिघाडी निर्माण झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आता त्यांच्या याच आरोपांवर काँग्रेसकडून उत्तर देण्यात आले आहे.
युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो Varsha Gaikwad ।
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीतील मतभेदाच्या वृत्तांचे स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलताना, “संजय राऊत यांनी त्यांचे वैयक्तिक मत दिले आहे आणि त्यापूर्वी अंबादास दानवे यांनीही त्यांचे वैयक्तिक मत दिले होते. राहिला प्रश्न युतीबाबत तर जो काही निर्णय घेतला जातो तो पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असे म्हणत राऊतांना टोला लगावला.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “युतीचे काय करायचे हे आमचे वरिष्ठ नेते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी ठरवतील. जर कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे पाहिले तर त्यांना असेही वाटते की त्यांना मिळायला हव्या तितक्या जागा मिळाल्या नाहीत. पण जेव्हा युतीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे काम केले. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे.” मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलताना त्यांनी,”गेल्या तीन वर्षांपासून आमच्या पक्षाचा मुंबई महानगरपालिकेत एकही नगरसेवक नाही हे आम्हाला माहिती आहे.” अशी खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
काँग्रेसला साईड लाईन करण्यावर भाष्य Varsha Gaikwad ।
काँग्रेसला बाजूला करण्याच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, “मला वाटत नाही की कोणीही काँग्रेसला बाजूला करू शकेल. काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे आणि आम्ही संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रातही निवडणुका लढवल्या आहेत. मला वाटते की कोणीही काँग्रेसला साईडलाईन करू शकत नाही.” काँग्रेसला बाजूला करा किंवा तिच्यावर दबाव निर्माण करा. काँग्रेसला आपले काम कसे करायचे हे माहित आहे, पण जेव्हा आपण युतीमध्ये असतो तेव्हा आपण परस्पर समंजसपणाने काम करतो.” असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधींनी भारताला एकत्र आणण्याचे काम केले
राहुल गांधींच्या प्रश्नावर वर्षा म्हणाल्या, “राहुल गांधी हे सामान्य लोकांचे नेते आणि एक जननेते आहेत ज्यांनी भारताला एकत्र आणण्यासाठी काम केले आणि राहुल गांधी सर्वांना सोबत घेऊन जाण्याबद्दल बोलतात. जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीचा प्रश्न येतो तेव्हा ते सर्वजण सोबतपुढे नेण्याचे काम करतात.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

