Pimpri | शाळा चौकातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

तळेगाव दाभाडे, – कार्तिकी एकादशी निमित्त शहरातील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पांडुरंगाची महापूजा गणेश भेगडे व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली.
यावेळी काकड आरती, भजन तसेच मंदिरामध्ये दुपारी हरिपाठ घेण्यात आला. दिवसभर मंदिरामध्ये प्रचंड भाविकांची गर्दी झाली होती. कार्तिकीनिमित्त मंदिरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातील सेवेकरी शंकर कांबळे यांचा बबनराव भेगडे व विश्वस्त बाळकृष्ण आरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन विश्वस्त आरडे, यतीन शहा, शामराव भेगडे, शेखर गुंड, पुरोहित अतुल देशपांडे यांनी केले होते.
कार्तिकी महाएकादशी निमित्त अॅड पु वा परांजपे विद्यालयात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी याचे नियोजन केले होते. हभप नितीन महाराज काकडे यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. नवीन समर्थ विद्यालयात मुख्याध्यापिका वसंती काळोखे व पर्यवेक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.





