आता याला काय म्हणावं !!! पुतिनच्या फोटोची आरती अन् रशियाचा जयजयकार ; वाराणसीचा व्हिडिओ व्हायरल

varanasi putin aarti। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारतात येत आहेत. ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. कारण २०१२ मध्ये युक्रेनियन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. युद्धामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या कठोर निर्बंधांदरम्यान, त्यांचा दौरा दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व आणखी दृढ करतो.
दरम्यन, व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहेच पण दोन्ही देशातील संबंध सुरळीत व्हावेत म्हणून भारतातील लोकांनी चक्क पुतीन यांची आरती केल्याचे दिसून येत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुतिन यांच्या आगमनापूर्वी वाराणसीमध्ये अभूतपूर्व उत्साह varanasi putin aarti।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीमध्ये लोकांनी रशियन राष्ट्राध्यक्षांचे मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे. पुतिन यांचे मोठे फोटो लावण्यात आले असून त्यांना फुले अर्पण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांची चक्क आरती करण्यात आली. स्थानिकांनी भारत-रशिया मैत्रीचे बॅनर घेऊन एक छोटी मिरवणूक देखील काढली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांच्या स्वागताच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
#WATCH | Uttar Pradesh | People perform aarti and hold welcome march in Varanasi ahead of Russian President Vladimir Putin’s visit to India (03.12) pic.twitter.com/Zibbpy423A
— ANI (@ANI) December 3, 2025
व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि कमेंट सेक्शनमध्ये त्यावर टीका झाली. काहींनी याला भारत-रशियाच्या खोल संबंधांचे उदाहरण म्हणून कौतुक केले, तर काहींनी वाराणसीच्या अनोख्या शैलीत “भव्य स्वागत” म्हटले.
दरम्यान, या भेटीच्या अगदी आधी, रशियाने भारतासोबतचे धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले. रशियन संसदेने भारतासोबतच्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण कराराला, रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट (RELOS) मान्यता दिली. या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांना एकमेकांच्या लष्करी तळांचा आणि लॉजिस्टिक्स सुविधांचा वापर सुलभ होईल, संयुक्त ऑपरेशन्स, युद्धाभ्यास आणि आपत्ती परिस्थितीत सहकार्यासाठी त्यांची क्षमता वाढेल.
भारत दौऱ्याविषयी बोलताना क्रेमलिनने,”यामुळे भारत आणि रशियामधील “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” आणखी दृढ होईल ” असे म्हटले आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान, पुतिन २३ व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेत देखील सहभागी होतील, ज्याठिकाणी संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा अपेक्षित आहेत.
varanasi putin aarti।





