Varanasi News : वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगेस’ एअर शोला सुरुवात; राफेल, तेजसच्या कसरतींनी वेधले लक्ष
भारतीय वायुसेनेचा ‘विंग्स ओव्हर गंगेस’ हा भव्य एअर शो गुरुवारी वाराणसीतील (Varanasi News) नमो घाटावर सुरू झाला.

Varanasi News : भारतीय वायुसेनेचा ‘विंग्स ओव्हर गंगेस’ हा भव्य एअर शो गुरुवारी वाराणसीतील (Varanasi News) नमो घाटावर सुरू झाला. गंगा नदीच्या वर अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी केलेल्या थरारक हवाई कसरती पाहण्यासाठी घाटांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राफेल आणि तेजस या लढाऊ विमानांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
भारतीय वायुसेनेच्या ९४ वर्षांच्या सेवेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशाची हवाई ताकद, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि हवाई दलाची कार्यक्षमता प्रदर्शित करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या एअर शोमध्ये एकूण १०० विमानांचा समावेश आहे. त्यामध्ये ५२ लढाऊ विमाने, १५ वाहतूक विमाने, ३२ हेलिकॉप्टर्स आणि एका ऐतिहासिक विमानाचा समावेश आहे.
राफेल, सुखोई-३० एमकेआय, मिराज २०००, तेजस, मिग-२९ आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे ठरली. चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स तसेच सी-१७ ग्लोबमास्टर वाहतूक विमानानेही (Varanasi News) सहभाग घेतला. ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीम आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमने चित्तथरारक कसरती सादर केल्या.
‘गरुड’ कमांडोंचा सहभागही लक्षवेधी ठरला. ‘काशी फॉर्मेशन’मध्ये तीन किरण विमानांनी ‘व्ही’ आकारात उड्डाण करत तिरंग्याचे रंग प्रदर्शित केले. ‘ओंकार फॉर्मेशन’मध्ये एमआय-१७ हेलिकॉप्टर्सनी तिरंगा ध्वज घेऊन उड्डाण केले. तर ‘त्रिदेव फॉर्मेशन’मध्ये लष्कर, नौदल आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सनी एकत्रित उड्डाण करून तिन्ही दलांमधील समन्वयाचे दर्शन घडवले.
देशभक्तीची भावना वाढते
देशातील १२ हवाई तळांवरील विमाने या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. २२, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी हा शो आयोजित केला जाणार असून, २३ ऑक्टोबर रोजी विधान परिषद निवडणुकांमुळे कार्यक्रम होणार नाही. २५ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सुरक्षेसाठी सुमारे ११,९०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. अशा कार्यक्रमांमुळे तरुणांमध्ये देशभक्तीची भावना वाढते आणि सशस्त्र दलांविषयी आदर दृढ होतो, अशी अशी भावना उपस्थितांनी (Varanasi News) व्यक्त केली.






