वनिता खरातची दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री? पोस्ट शेअर करत म्हणाली…

मुंबई – अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिच्या विनोदी शैलीचे नेहमीच खूप कौतुक होत असते. अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता वनिता खरात दाक्षिणात्य चित्रपटामध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे.
वनिता खरातने तिचा साऊथ लुकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. यावरूनच वनिता दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहेत. हा फोटो शेअर करत वनिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”एकदा येऊन तर बघा’ माझा South Indian अवतार ! प्रेमळ माणसांनी प्रेमाने केलेली कलाकृती! 24 नोव्हेंबरपासून फक्त सिनेमागृहात ‘एकदा येऊन तर बघा” असे प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
View this post on Instagram
याचाच अर्थ हा लुक वनिताने येत्या 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटासाठी केला आहे. यात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद खांडेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.





