Vande Bharat Accident : दसरा मेळाव्यावरून परतत असताना वंदे भारतच्या धडकेत ४ चौघांचा मृत्यू !

Vande Bharat Accident : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे वंदे भारत एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला. जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्स्प्रेसने धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जबनपूरजवळ कटिहार-जोगबनी रेल्वेमार्गावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक दसरा मेळाव्यावरून परतत असताना रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. त्याच वेळी वेगात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस त्यांना धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. जखमींना तातडीने पूर्णिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या मृत्यूचे नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती तपासण्याचे काम सुरू आहे.
बिहारमध्ये एका आठवड्यात वंदे भारत एक्स्प्रेसशी संबंधित हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी, गतमहिन्यात ३० सप्टेंबर रोजी सहरसा येथील हटियागाची रेल्वे क्रॉसिंगजवळ एका तरुणाचा याच ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला होता.





