फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Devendra Fadnavis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली आहे. संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात आणि तिने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. तसेच मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातील भागाची मोडतोड केली.
संबंधित महिलेने मंत्रालयाचा पास न काढता गेटमधून एन्ट्री केली. ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तोडफोड केली. या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि घोषणाबाजी केली. अद्याप ही महिला कोण आहे हे समजू शकलेले नाही. Devendra Fadnavis |
पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू
पोलीस आयुक्तांनी याबाबत गंभीर दखल घेतली असून या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच मंत्रालयातील सुरक्षेची ही मोठी चूक असल्याची चर्चा होत आहे. या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. Devendra Fadnavis |
सुषमा अंधारे यांचे ट्वीट
गृहमंत्री @Dev_Fadnavisसाहेबांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षे हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे.
जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी.. @PTI_News @ShivsenaUBTComm— SushmaTai Andhare (@andharesushama) September 27, 2024
यावरून मंत्रालयातील गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नाही, याबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षा हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे. जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी..”, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हंटले आहे.





