‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश; वंचित बहुजन आघाडीला धक्का
Updated On:

उस्मानाबाद – मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात सुरेश कांबळे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे वंचितसाठी हा मोठा धक्का आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या 16 तारखेला सुरेश कांबळे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत.





