Walmik Karad : वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात; जेलमधील आरोपीनं दिली मोठी कबुली

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने काही दिवसांपूर्वी सीआयडीसमोर सरेंडर केलं.
त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जारी करत दोषी नसल्याचे सांगितले. यानंतर बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. यातच या प्रकरणातील आणखी एक अपडेट समोर आली आहे. Walmik Karad |
विष्णू चाटेची वाल्मिक कराडबाबत मोठी कबुली
अटकेत असलेल्या आरोपी विष्णू चाटे यानं वाल्मिक कराडबाबत मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता, अशी माहिती चाटे याने सीआयडी तपासात दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.
याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यामुळे यातही वाल्मिक कराडचं कनेक्शन बाहेर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड याच्यावर केवळ खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता, पण आता याबाबतची कबुली अटकेतील आरोपी विष्णू चाटेनं दिल्याने वाल्मिक कराडच्या अडचणींत वाढ झाली आहे. Walmik Karad |
वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि इतर आरोपींविरोधात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी याबाबतची तक्रार दिली होती. त्यांनी वाल्मिक कराडने आपल्या फोनवरून खंडणीसाठी धमकी दिल्याचा दावा केला होता. आता कंपनीच्या मॅनेजरनं केलेल्या तक्रारीला विष्णू चाटेच्या कबुलीमुळे दुजारा मिळत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
तीन आरोपी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत
या प्रकरणातील वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतिक घुले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केले आहे. यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रसिद्धपत्रक जाहीर करत आरोपींना फरार घोषित केले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा:
नेवासा : गुन्हे शाखेच्या पोलीसांची धडक कारवाई; गोवंशी जनावरांची केली सुटका




