Vaishno Devi Temple : वैष्णोदेवी मंदिरातील चांदी प्रकरण गाजले.! मंदिरातील ५०० कोटींची चांदी बनावट? न्यायालयाने मागवली महत्वाचे कागदपत्रे
जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट चांदीच्या अर्पण प्रकरणात जम्मू न्यायालयाने कठोर भूमिका घेतली.

Vaishno Devi Temple – जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट चांदीच्या अर्पण प्रकरणात जम्मू न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह समन्स बजावले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे. जम्मूचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुनीश कुमार मनहास यांच्या न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला पुढील सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Vaishno Devi Temple)
वकील दीपक शर्मा यांनी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले. यापूर्वी वकिलांनी पोलीस महानिरीक्षक (गुन्हे शाखा, जम्मू) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, जम्मू) यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती. (Vaishno Devi Temple)
या तक्रारीत श्री माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या नैवेद्यातील कथित भेसळ, वस्तू बदलणे आणि संभाव्य अपहार या प्रकरणी एफआयआर नोंदवून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. (Vaishno Devi Temple)

Vaishno Devi Temple : वैष्णोदेवी मंदिरातील चांदी प्रकरण गाजले.! मंदिरातील ५०० कोटींची चांदी बनावट? न्यायालयाने मागवली महत्वाचे कागदपत्रे
९ मे २०२६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत, वकील दीपक यांनी गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, अपहार, नोंदींमध्ये फेरफार आणि कॅडमियमयुक्त सामग्रीची संभाव्य खरेदी किंवा वापर यासह गंभीर दखलपात्र गुन्ह्यांचा आरोप केला आहे. (Vaishno Devi Temple)
गुन्हे शाखेकडून कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने, तक्रारदाराने केलेल्या कारवाईचा अहवाल आणि एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करण्यासाठी योग्य निर्देश मिळावेत याकरिता जम्मू येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली.





