वैष्णवीचे 9 महिन्यांचे बाळ कस्पटे कुटूंबियांकडे सुपूर्द; अज्ञात व्यक्तीचा फोन अन्….नेमकं काय घडलं?

Vaishnavi Hagawane Death | पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाचा शोध घेतला जात होता. अखेर वैष्णवीचे बाळ तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्याने आम्हाला बोलवलं आणि बाळ आमच्या ताब्यात दिल्याची माहिती कस्पटेंनी यांनी दिली आहे.
कस्पटे कुटुंबियांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हायवेजवळ येऊन तुमचे बाळ घेऊन जा…असे सांगितले. त्यानंतर वैष्णवीचे काका बाणेरच्या हायवेजवळ गेले आणि त्यांना 9 महिन्यांचे बाळ सुपुर्द केले.
वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांसोबत संवाद साधतान सांगितले की, “माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिलं. बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहत आहोत. वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा सांभाळ करणार आहोत. मला कोणाचाही फोन आला नाही, भावाला फोन आला होता. आमचं बाळ आम्हाला मिळालं आहे, त्यामुळे आम्हाला आनंद आहे,” असंही ते म्हणाले.
आतापर्यंत बाळ कुठे होते?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या सासरच्यांनी सोपवले होते. वैष्णवीच्या मृत्यूला 6 दिवस झाले मात्र तरीदेखील तिच्या बाळाचा काहीच पत्ता लागत नव्हता. वैष्णवीचे बाळ तिच्या पतीच्या मावस भावाकडे सोपवण्यात आले होते. नातवाला आणण्यासाठी बाळाचे आजोबा गेले असता निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. Vaishnavi Hagawane Death |
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे बाळ सध्या हगवणे यांचे मावसभाऊ अमित पोवळे यांच्याकडे सांभाळायला दिलेले होते. वैष्णवीचे बाळ ३ दिवस पवळे कुटुंबीयांकडे होते. आता हे बाळ आता वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले. वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना फोन करत या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Vaishnavi Hagawane Death |
हेही वाचा :
महिला आयोगाचा कारभार म्हणजे ‘वराती मागनं घोडं’; रोहिणी खडसेंची चाकणकर, वाघ यांच्यावर टीका





