“आज माझे पप्पा गेले…आता काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं?” ; वैभवी देशमुखचा प्रशासनाला संतप्त सवाल

Vaibhavi Deshmukh । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिन्याचा काळ लोटला आहे . मात्र तरीही पोलिसांच्या तपासावर देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता पाहायला मिळाली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावातील पाण्याच्या टाकीवर चालून आंदोलन केले. एवढेच नाही तर गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयी असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केलाय.
सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रशासनाला,”माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचलून नेलं..आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? आज माझे पप्पा गेले . काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं .आज जसा काका वर गेलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल. आमचा एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडत नाही. ज्यावेळी कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे आरोपींना पकडतील का? असे काही संतप्त सवाल विचारले आहेत.
टाेकाचं पाऊल उचलल्यावरच डोळे उघणार का? Vaibhavi Deshmukh ।
पुढे वैभवीने माध्यमांद्वारे सरकारला,”काकाशी बोललो नाहीत पण ते गेल्या चार दिवसांपासून प्रचंड तणावाखाली आहे. प्रशासनाला तो एकच सवाल करतोय, जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. नुसतच पोलीस प्रशासन येताय उभे राहतंय नक्की प्रक्रिया काय चालली आहे हे अद्यापही आम्हाला माहित नाही.आम्ही टोकाचं काही केल्यावर यांच्या डोळे उघडणार आहेत का? आक्रमक प्रश्न केला आहे.
आता काकाच्या बाबतीत काही झालं तर… Vaibhavi Deshmukh ।
पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा काका वर टाकीवर गेला. असं असतानाही यांना माहीत कसं नाही काका कुठे गेला ? माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचललं, अपहरण केलं…आता काकाच्या बाबतीत काही झालं तर उपयोग काय प्रशासनाचा दारासमोर असून? अजूनही एक आरोपी फरारच आहे. हे शोध कधी लावणार ?आरोपींना अटक कधी करणार ? आम्हाला न्याय कधी मिळणार ? इतके दिवस शांतपणे न्याय मागत होतो. आता कुटुंबातील कोणीतरी टोकाचे पाऊल उचलल्यावरच न्याय देणार आहात का ?असे सवाल करत वैभवी देशमुखने प्रशासनाच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





