Vaibhav Fake Video : वैभव सूर्यवंशीचं हर्षा भोगलेंशी थेट गैरवर्तन? ‘त्या’ वादग्रस्त VIDEO मागचं धक्कादायक सत्य आलं समोर!
Vaibhav Fake Video : सोशल मीडियावर वैभव आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वैभव हर्षा भोगले यांना अत्यंत उद्धट आणि गर्विष्ठपणे उत्तर देताना दिसत आहे.

Vaibhav Sooryavanshi Harsha Bhogle Fake AI Video : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचणारा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर वैभव आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वैभव हर्षा भोगले यांना अत्यंत उद्धट आणि गर्विष्ठपणे उत्तर देताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे वैभववर मोठ्या प्रमाणात टीका होत असतानाच, आता या व्हिडिओमागील एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले आहे.
हर्षा भोगले भडकले! थेट बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्सकडे धाव –
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पूर्णपणे बनावट असून तो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चुकीच्या डबिंगच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा बनावट व्हिडीओ समोर आल्यानंतर हर्षा भोगले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत यामागचे सत्य उघड केले आणि वैभवची बाजू घेतली. भोगले म्हणाले, “सोशल मीडियावर माझा आणि वैभव सूर्यवंशीचा एक बनावट डब केलेला व्हिडिओ फिरत आहे. त्यामध्ये वैभवला उद्धट दाखवण्याचा खोडसाळ प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी त्याला असा कोणताही प्रश्न विचारला नव्हता आणि त्यानेही असे कोणतेही उत्तर दिलेले नाही.”
Harsha Bhogle calls out a fake dubbed video circulating on social media that falsely portrays Vaibhav Sooryavanshi as rude and arrogant#HarshaBhogle #VaibhavSooryavanshi #IndianCricket #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/xuIkDN4ccr
— InsideSport (@InsideSportIND) June 2, 2026
ते पुढे म्हणाले, “एका १५ वर्षांच्या लहान मुलाबाबत असा दिशाभूल करणारा कंटेंट तयार करणे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे. माझ्या आतापर्यंतच्या सर्व भेटींमध्ये वैभव नेहमी कमालीचा नम्र आणि आदराने वागलेला आहे.” या प्रकरणात सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हर्षा भोगले यांनी थेट बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्सला (RR) आपल्या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
व्हिडिओचे मूळ सत्य काय होते?
हा व्हायरल व्हिडिओ ‘बीसीसीआय नमन अवॉर्ड्स २०२६’ (BCCI Naman Awards) या कार्यक्रमातील आहे. त्या कार्यक्रमात हर्षा भोगले यांनी वैभव सूर्यवंशीची अधिकृत मुलाखत घेतली होती. मात्र, काही समाजकंटकांनी या मूळ व्हिडिओचे एडिटिंग करून त्यात एआय (AI) द्वारे बनावट ऑडिओ जोडला आणि तो सोशल मीडियावर पसरवला.मूळ मुलाखतीत वैभवने अतिशय साधेपणाने आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, “यंदा आमचे लक्ष्य संघासाठी ट्रॉफी जिंकण्याचे आहे. आमची तयारी चांगली सुरू आहे आणि सर्व खेळाडू आत्मविश्वासात आहेत. त्यामुळे यंदा ट्रॉफी आमच्याच संघाकडे येईल, अशी आशा आहे.”
सोशल मीडियावरील ‘डीपफेक’चा नवा धोका!
Bhai ne yaha bhi bowl boundary ke bahar mar di….
Savage of hitting six on first bowl of Baby Boss so reflected in his savage response to ace cricket commentator Harsha Bhogle Bhau in Gala Gathering of IPL. pic.twitter.com/WHYg1l0CPB— Shaurya Mishra (@shauryabjym) June 2, 2026
गेल्या काही महिन्यांत AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले बनावट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वैभव सूर्यवंशीच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, हे सिद्ध झाले आहे. हर्षा भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे वैभवची प्रतिमा डागाळण्यापासून वाचली असली, तरी अशा खोट्या माहितीमुळे तरुण खेळाडूंवर मानसिक दबाव येऊ शकतो, अशी चिंता क्रीडा वर्तुळात व्यक्त केली जात आहे





