Sanjay Raut : “वहिनी साहेबांना दिल्लीत खूप मोठा बंगला मिळेल,” संजय राऊतांचा अमृता फडणवीसांना टोला
Sanjay Raut : हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे - संजय राऊत

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळून त्यांची दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले. मात्र या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं सांगितले.
याशिवाय फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेच जाणार नाहीत. मी त्यांना कुठे जाऊ देणार नाही. ते महाराष्ट्रातच राहतील, असं विधान केलं होतं. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान, संजय राऊत यांना अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याबाबतच्या विधानाबाबत विचारलं. मिसेस फडणवीसही म्हणत आहेत की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. Sanjay Raut
‘वहिनी साहेबांच्या भावना समजू शकतो’
त्यावर संजय राऊत म्हणाले की, “आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत, या महान सेवकांने असं सांगितलं होतं की, जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं या महान सेवकाचे वक्तव्य मला या क्षणी आठवतंय. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजू शकतो, पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचा आहे आरएसएससाठी, संघासाठी, भाजपसाठी. राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत,” असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे. Sanjay Raut
‘इथल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं’
“यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले, महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काय सांगायचे, आधी देश मग राज्य ही आमची भूमिका आहे. देशाने जर मला साद घातली तर देशासाठी प्राण देईन, इथं काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इथल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, खूप मोठा बंगला मिळेल, त्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. Sanjay Raut
हेही वाचा:






