Vadgaon Maval : दुःखाच्या सावटात वडगावकर एकवटले; गावाच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल
सामूहिक सहभागातून वडगावकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुरू

वडगाव मावळ – ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरावर दुःखाचे सावट पसरले होते. या कठीण परिस्थितीतही वडगावकर एकवटले आणि सामूहिक सहभागातून गावाच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेचे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात वडगाव शहरातील जवळपास १५ ते २० नागरिकांचे निधन झाले होते. यामध्ये माजी मंत्री मदन बाफना यांच्यासह काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. तसेच शिवराज कडू, संकेत पवार आणि दत्तात्रय केदारी या तीन तरुणांचे आकस्मिक निधन झाले होते. या घटनांमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली होती. या दुःखद परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली.
यावेळी सामूहिक सहभागातून वडगावकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुरू करण्याचा विचार पुढे आला. यासाठी गणेशोत्सव मंडळे आणि ग्रामस्थांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला गणेशोत्सव मंडळे, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांच्या सहकार्यातून जमा झालेल्या रकमेतून श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोक ढमाले, ॲड. तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनीता कुडे, पुजारी विवेक गुरव, पंडितराव जाधव, अशोक बाफना, सुधाकर शेळके, नगराध्यक्ष अबोली ढोरे
विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, गणेश म्हाळसकर, अजय भवार, ह.भ.प. नंदकुमार भसे, चंद्रकांत राऊत, गंगाधर ढोरे, किरण म्हाळसकर, भूषण मुथा आणि अनिल ओव्हाळ उपस्थित होते.
Pune District : गडकोट किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करणार- कांचन कुल





