लस निर्मितीला वेग येणार; सीरम, भारत बायोटेकला 4500 कोटींचे अर्थसहाय्य
Updated On:

नवी दिल्ली – अर्थ मंत्रालय सिरम इन्स्टिट्यूटला तीन हजार कोटी आणि भारत बायोटेकला 1500 कोटी असे एकूण 4500 कोटींचे अर्थसहाय्य देणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी लस उत्पादनात वाढ करण्यासाठी तीन हजार कोटी आवश्यक आहेत असे म्हटले होते. फिक्कीने सुद्धा सरकारने देशात कोविड 19 चा प्रकोप पाहता लस उत्पादनात वाढ करण्यासाठी उत्पादन प्रोत्साहन राशी सरकारने द्यावी असा सल्ला दिला होता. त्यानुसार उत्पादन प्रोत्साहन योजनेअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्यास सरकारने परवानगी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्राने जाहीर केलेले आर्थिक मदत पॅकेज महत्वाचे ठरणार आहे.





