Uttarakhand : उत्तराखंडमध्ये कार दरीत कोसळून 10 भाविकांचा जागीच मृत्यू

पिथौरागड :- उत्तरखंडमधील मुनसियारी येथे देवदर्शनासाठी जाणारी कार दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पिथौरागड आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मसुरी-होकरा मोटरवेवरील पुरवठा गोदामाजवळ एक वाहन अपघात झाल्याची माहिती पोलीस स्टेशनकडून मिळाली. या भीषण अपघातात वाहनचालकासह 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही कार 600 मीटर खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वरच्या शामा इथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी येत होते. याआधीही त्यांची कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
या अपघातातील 7 जण साम गावातील आणि अन्य तीन जण बागेश्वर येथील रहिवाशी होते.
दरम्यान, या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे.





