औरंगजेबपूर झाले आता शिवाजी नगर, ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातील अनेक ठिकाणांची नावं बदलली

Uttarakhand News | उत्तराखंड सरकारने राज्यातील 7 जिल्ह्यांतील एकूण 17 ठिकाणांची नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, देहरादून, नैनीताल आणि ऊधमसिंह नगर या जिल्ह्यांमधील विविध स्थळांची नावे बदलण्याची घोषणा केली आहे. ही नामकरण प्रक्रिया जनभावना आणि भारतीय संस्कृती तसेच वारसा यांच्याशी सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी स्पष्ट केले आहे.
रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महत्त्वाचा निर्णय घेत हरिद्वार, देहरादून, नैनीताल आणि ऊधमसिंह नगर जिल्ह्यांमध्ये असलेल्या विविध ठिकाणांची नावे बदलण्याची घोषणा केली आहे. शासनाने जारी केलेल्या यादीनुसार, हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर आता शिवाजी नगर म्हणून ओळखले जाईल. तर गाझीवालीचे नाव आर्यनगर, चांदपूरचे नाव ज्योतिबा फुले नगर, मोहम्मदपूर जटचे नाव मोहनपूर जट, खानपूर कुर्सलीचे नाव आंबेडकर नगर, इद्रीशपूरचे नाव नंदपूर, खानपूरचे नाव श्री कृष्णपूर आणि अकबरपूर फाजलपूरचे नाव विजयनगर असे करण्यात आले आहे.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami announced the change in the names of various places located in Haridwar, Dehradun, Nainital and Udham Singh Nagar districts. The Chief Minister said that the naming is being done in accordance with public sentiment and Indian culture… pic.twitter.com/nx2126xi44
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 31, 2025
यासोबतच, देहरादून जिल्ह्यातील देहरादून महानगरपालिका ब्लॉकमधील मियांवाला आता रामजीवाला म्हणून ओळखले जाईल, तर विकासनगर ब्लॉकमधील पीरवालाचे नाव केसरी नगर, विकासनगरमधीलच चांदपूर खुर्दचे नाव पृथ्वीराज नगर आणि सहसपूर ब्लॉकमधील अब्दुल्लापूरचे नाव दक्षनगर असे बदलण्यात आले आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, विविध ठिकाणांची नावे बदलण्याचे काम जनभावना आणि भारतीय संस्कृती तसेच वारसा यानुसार केले जात आहे. जेणेकरून, लोकांना भारतीय संस्कृती आणि तिच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांकडून प्रेरणा घेता येईल.





