उत्तराखंड । केदारनाथ पायी मार्गावर अपघात, चिरबासा जवळ दरड कोसळली; ३ ‘ठार’, २ ‘जखमी’

Uttarakhand । उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये २१ जुलैला मोठी दुर्घटना घडली. येथे केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून ढिगारा पडल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. चिबासा जवळ हा अपघात झाला. ये-जा करणाऱ्यांनी तत्काळ स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, ‘चिबासा जवळ दरड कोसळल्याची माहिती मिळाली. या अपघातात काही प्रवाशांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची बातमी आहे. अपघातातील काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Uttarakhand । ढिगारा हटवण्यासाठी टीम दाखल
घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. दरड कोसळल्याने फूटपाथ पूर्णपणे बंद झाला आहे. चालण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड पडलेले आहेत. हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या मार्गावर चारचाकी वाहने धावत नाहीत.
केदारनाथ यात्रा मार्ग के पास पहाड़ी से मलबा व भारी पत्थर गिरने से कुछ यात्रियों के हताहत होने का समाचार अत्यंत दुःखद है। घटनास्थल पर राहत एवं बचाव कार्य जारी है, इस सम्बन्ध में निरंतर अधिकारियों के संपर्क में हूं। हादसे में घायल हुए लोगों को त्वरित रूप से बेहतर उपचार उपलब्ध…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) July 21, 2024
Uttarakhand । बचाव पथक घटनास्थळी पोहोचले
बचाव पथक रस्त्यावरील ढिगारा हटवण्यात व्यस्त आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,’डोंगरावरून अचानक मोठे दगड पडू लागले. कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. 8-10 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, यासंदर्भात मी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.’
Uttarakhand । अधिकाऱ्याने सांगितले की
मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाईल. त्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती पाठवली जाईल. घटनास्थळावरून लवकरात लवकर मलबा हटवण्यात येईल. सध्या पादचाऱ्यांना त्या मार्गावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मसुरी-डेहराडून महामार्गावर दरड कोसळली होती, त्यामुळे काही काळ वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. मयत किशोर अरुण पराते (३१ वर्षे) हा महाराष्ट्रातील नागपूरचा रहिवासी होता. मृत सुनील महादेव काळे (२४ वर्षे) हा महाराष्ट्रातील जालना येथील रहिवासी होता. मृत अनुराग बिष्ट हा रुद्रप्रयाग तिलवाडा येथील रहिवासी आहे.





