Uttar Pradesh : भाजप राजवटीत देशाची कमालीची पिछेहाट – अखिलेश यादव

लखनौ – भाजपच्या राजवटीत देश आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कमालीच्या पिछाडीवर गेला आहे. जनतेला या सरकारचा फोलपणा लक्षात आला असून जनता आता 2024 च्या निवडणुकीत भाजपला दिल्लीतून हद्दपार करेल असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.
भाजप केवळ श्रीमंतांसाठी काम करत असून त्यांच्या राजवटीत लोकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/industry-minister-uday-samants-clarification-on-investments-at-davos/
गरिबी, बेरोजगारी, उपासमार, महागाई याबरोबरच भाजपने सर्वसामान्य जनतेला द्वेषाचे राजकारण दिले. त्यांच्या राजवटीत केवळ श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, असे अखिलेश यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपा ने अमीर को अमीर बनाकर आम जनता को ग़रीबी, बेरोज़गारी, भुखमरी, महंगाई के साथ नफ़रत की राजनीति दी है। भाजपा के शासनकाल में देश आर्थिक, सामाजिक, मानसिक और राजनीतिक रूप से सालों पीछे चला गया है।
2024 के चुनाव में जनता भाजपा को यूपी की सभी 80 सीटें हरा देगी, दिल्ली से हटा देगी। pic.twitter.com/Shl4b94zda
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 23, 2023
येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उत्तरप्रदेशातील सर्व 80 जागा गमवाव्या लागतील असा दावाहीं त्यांनी केला.





