Archana Gautam : CID मध्ये मृतदेह बनायची अभिनेत्री; आज मुंबईत हक्काचं घर, अर्चना गौतमने सांगितले सुरुवातीचे दिवस
Archana Gautam : तिचे डोळे उघडले नाहीत ना किंवा शरीराची कोणतीही हालचाल होत नाही ना, यावरही वरिष्ठ कलाकार आणि टीमचे बारकाईने लक्ष असायचे

Archana Gautam : कोणत्याही कलाकाराला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठा संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. अशीच अभिनेत्री आहे जिने तिच्या आष्युयात मोठ्या संघर्षाचा सामना केला आहे. ज्या विषयी तिने एका शोमध्ये महत्वाचा खुलासा केला. या अभिनेत्रीचे नाव आहे अर्चना गौतम. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘बिग बॉस 16’मधील स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त स्वभावामुळे ती लोकप्रिय झाली. अर्चनाने अलीकडेच आपल्या संघर्षमय कारकिर्दीबद्दल अभिनेता राजीव खंडेलवाल याच्या शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. या शोमध्ये बोलताना अर्चनाने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील अनुभव शेअर केला.
ग्लॅमरच्या दुनियेत स्थान मिळवण्यासाठी तिने अनेक छोट्या भूमिका स्वीकारल्या. यामध्ये ‘सीआयडी’सारख्या लोकप्रिय मालिकेचा समावेश आहे. या मालिकेत तिने मृतदेहाची भूमिका केली होती.
अर्चनाने सांगितले की, ‘सीआयडी’ हा तिच्या कारकिर्दीतील तिसरा टीव्ही शो होता. या मालिकेत मृतदेहाची भूमिका साकारण्यासाठी तिला दिवसाला सुमारे 3 हजार रुपये मानधन मिळत असे. शूटिंगदरम्यान तिला कधी जमिनीवर तर कधी स्ट्रेचरवर पूर्णपणे निश्चल अवस्थेत पडून राहावे लागायचे.
तिचे डोळे उघडले नाहीत ना किंवा शरीराची कोणतीही हालचाल होत नाही ना, यावरही वरिष्ठ कलाकार आणि टीमचे बारकाईने लक्ष असायचे. तिने सांगितले की, कोणतीही हालचाल न करता खूप वेळ पडून राहणे हे खूप आव्हानात्मक होते. मात्र, करिअर घडवण्याच्या जिद्दीपोटी तिने हे काम स्वीकारले आणि पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडले.
याआधी एका मुलाखतीत अर्चनाने मुंबईतील संघर्षाचे दिवसही उलगडले होते. मुंबईत आल्यानंतर ती एका चाळीत राहत होती, जिथे झोपेत असताना उंदीर चावत असायचे. त्यामुळे तिला उन्हाळ्यातही चादर घेऊन झोपावे लागायचे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकिची असल्याने अनेकदा उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ तिच्यावर आली होती.
मात्र, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अर्चनाने स्वतःचे स्थान निर्माण केले. आज ती मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा बनली असून मुंबईत स्वतःचे घरही खरेदी केले आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे.
हेही वाचा : naval ships: ‘दुनागिरी, ‘संशुधर’ आणि ‘अग्रया’…’ स्वदेशी जहाजे भारतीय नौदलात सामील ; देशाची सागरी ताकद वाढली





