Jackie Shroff : “तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा”; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा
Jackie Shroff : जगभरात निर्माण झालेल्या पेट्रोल आणि गॅस संकटावर जॅकी श्रॉफ यांचे परखड मत

Jackie Shroff : बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
जगभरात निर्माण झालेल्या पेट्रोल आणि गॅस संकटावर त्यांनी परखड मत व्यक्त केले. जॅकी श्रॉफ यांनी लोकांना इंधन वाचवण्याचे आणि संसाधनांचा सुज्ञपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
प्रसारमाध्यमांशी बोलताना जॅकी श्रॉफ सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत म्हणाले, “सध्या जगभरात परिस्थिती खूप गंभीर आहे. पण आपल्या भारतात लोकांना अन्न, पाणी अतिशय आरामात मिळत आहे. पेट्रोल आणि गॅस देखील कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय उपलब्ध आहेत.
प्रत्येक गोष्टीवर उगाच तक्रार करत बसण्यापेक्षा ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यांचा जपून वापर करा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या हटके शैलीमुळे ते अधिक चर्चेत असतात. ‘परिंदा’, ‘राम लखन’, ‘खलनायक’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘द ग्रेट ग्रँड सुपरहिरो’ येत्या २९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मनीष सैनी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आला आहे. Jackie Shroff
हेही वाचा:





