“हिंदूस्तानी भाऊमागे भाजपाची IT CELL” सरकारला बदनाम करण्यासाठी उपयोग

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शने केली.
त्यानंतर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वृत्तमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावरून भाजपवर टीका केली आहे. हिंदूस्तानी भाऊमागे भाजपाची आयटी सेल असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले सचिन सावंत
“महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हिंदूस्तानी भाऊचा उपयोग केला जात आहे अशी शंका आहे. त्यामुळे याची चौकशी सरकारने केली पाहिजे. ते पुढे म्हणाले,’हिंदूस्तानी भाऊच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव टाकण्यात आला. हिंदूस्तानी भाऊला भाजपाच्या आयटीसेलने पुढे आणले आहे. हिदुस्तानी भाऊच्या मागे असलेली कंपनी भाजपाने सुरु केलेली आहे.’





