बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
Updated On:

पुणे – राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येतं आहे. खडकी येथे विजयादशमीनिमित्त अनेक व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीला आणले आहेत. मात्र ही फुले ग्राहकांना बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतुन देण्यात येतं आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खडकी कॅन्टोमेंट बोर्डाने प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू नका असा फलक लावलेल्या ठिकाणीच हा प्रकार चालू आहे.






