तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप

Tirupati Balaji | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती मंदिरातील प्रसादाबाबत मोठा दावा केला आहे. तिरुपतीच्या प्रसादातील लाडूमधे तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरल्याचा धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीने भक्तांसाठी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूंबद्दल केलेल्या या आरोपामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील पाच वर्षांत YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. ‘अन्नदानम’च्या गुणवत्तेशी YSR काँग्रेसने तडजोड केली, असा आरोप चंद्रबाबू यांनी केला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCPकडून चंद्राबाबूंचा आरोप खोडून काढला आहे. Tirupati Balaji |
जगनमोहन रेड्डी यांचा सवाल
चंद्राबाबू नायडू यांनी हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचल्याचा आरोप YSR कडून करण्यात आला. भाविकांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसादच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहोत. चंद्राबाबूही कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का? असा सवाल जगनमोहन रेड्डी यांनी उपस्थित केला. Tirupati Balaji |
चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी गंभीर आरोप केला आहे. पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आला आहे. . शुद्ध तुपाऐवजी त्यांनी प्राण्यांची चरबी वापरली. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असं देखील चंद्राबाबूंनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
IND vs BAN 1st Test : फिरकीचा सामना करण्यासाठी आमची फलंदाजी सक्षम – गौतम गंभीर





