अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा जागतिक विकास दरावर विपरीत परिणाम; 2025 मध्ये दरात घसरण

कोलकत्ता – अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा आणि विविध देशादरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक व्यापारावर आणि विकास दरावर 2025 वर्षात नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत एका अभ्यासावाला जारी करण्यात आले आहे.
क्रिसील य संस्थेने केलेल्या मूल्यांकनानुसार व्यापार युद्धामुळे जागतिक विकास दरावर यावर्षी नकारात्मक परिणाम होणार आहे. यावर्षी जागतिक विकासदर केवळ 2.9% इतका भरणार आहे. जो की गेल्या वर्षी 3.3% इतका होता. गेल्या वर्षी जागतिक व्यापार2.9 टक्क्यांनी वाढला होता. यामध्ये यावर्षी किमान 0.2% ची घट होणार आहे. किंबहुना याहीपेक्षा जास्त घट जर अमेरिकेने अनपेक्षितरित्या काही घोषणा केल्या तर होऊ शकतो असे या संस्थेला वाटते.
अमेरिकेने विविध देशाविरोधात एकतर्फी आयात शुल्क लावले आहे किंवा स्वतःचा फायदा होईल अशा पद्धतीने विविध देशाबरोबर व्यापार करार करण्यास सुरुवात केलेली आहे. याचा खरोखरच अमेरिकेला फायदा होईल का नाही हे एखाद्या वर्षानंतरच कळेल. मात्र अमेरिकेच्या या आयात शुल्काची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर या घटनाक्रमाचा व्यापारावर खर्या अर्थाने परिणाम होईल.
व्यापार करारावरील चर्चा अमेरिकेच्या व्यापार युद्धाच्या अगोदरही चालू होती. तशाच पद्धतीने ही चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी अनेक देशाविरोधात किती शुल्क लावणार आहोत असे पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिस्तबद्ध जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे आणि तो चालूच राहण्याची शक्यता आहे.
भारतावर किती परिणाम
भारत आणि अमेरिकेत दरम्यानचा वस्तूचा व्यापार गेल्यावर्षी 2.8 टक्क्यांनी वाढला होता. सध्या चर्चा चालू आहे त्यामुळे व्यापारावर जास्त परिणाम झालेला नाही. मात्र एकूण परिस्थिती पाहता भारत अमेरिकेदरम्यानचा व्यापार यावर्षी केवळ 1.7 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. मात्र सेवा क्षेत्रातील वाढ आणि अनिदवासी भारतीयांच्या गुंतवणुकीमुळे चालू खात्यावरील तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.3% पर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.


