ड्रॅगनचा अमेरिकेवर भडका ! “आम्ही युद्धाचा कट रचत नाही किंवा त्यात सहभागीही नाही” ; ट्रम्पला चीनचे सडेतोड उत्तर

US Tariffs। अमेरिका आणि नाटो देशांमधील रशियाकडून तेल खरेदीवर शुल्क आणि निर्बंधांच्या वाढत्या मागणी दरम्यान, चीनने आता अमेरिकेला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. चीनने आपली भूमिका स्पष्ट करत,”ते कोणत्याही युद्ध कटात सहभागी नाहीत आणि त्यात सहभागीही नाहीत.” असे ठणकावून सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच नाटो देशांना रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्याचे आणि त्यावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचे आवाहन केले. याविषयी ट्रम्प यांनी,”काही नाटो देश अजूनही रशियाकडून तेल खरेदी करून युतीची स्थिती कमकुवत करत आहेत. त्यांनी इशारा दिला की, नाटो देश एकत्र येऊन असे पाऊल उचलत नाहीत तोपर्यंत अमेरिका रशियावर मोठ्या प्रमाणात नवीन निर्बंध लादणार नाही.”
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी काय म्हटले? US Tariffs।
दरम्यान, स्लोव्हेनियाच्या भेटीदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि निर्बंध केवळ परिस्थिती गुंतागुंतीचे करतात. वांग यी म्हणाले की चीन युद्धासाठी कट रचत नाही किंवा त्यात सहभागीही होत नाही, जो अमेरिकेला थेट संदेश मानला जात आहे.
भारत आणि चीनवरही दबाव US Tariffs।
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने आधीच भारतावर मोठे शुल्क लादले आहे, तर चीनवर अद्याप थेट निर्बंध लादलेले नाहीत. ट्रम्प प्रशासनाला वाटते की G7 देशांनी भारत आणि चीनवर दबाव वाढवावा, कारण हे दोन्ही देश रशियाचे मोठे ऊर्जा खरेदीदार आहेत.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट काय म्हणाले?
G7 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की रशियाचे तेल उत्पन्न पूर्णपणे बंद होईपर्यंत पुतिन यांचे ‘युद्ध यंत्र’ कमकुवत होऊ शकत नाही. त्यांनी सर्व देशांना या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
अमेरिका-चीन संबंधांवर वांग यी यांचे मत
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी अलिकडेच झालेल्या संभाषणात स्पष्ट केले की दोन्ही देशांनी त्यांच्या मार्गापासून विचलित होऊ नये आणि सहकार्य कायम ठेवावे. चीनने कोणत्याही परिस्थितीत संघर्षाच्या मार्गावर जाऊ इच्छित नसल्याचे संकेत दिले.





