“भारत रशियाला पाठिंबा देण्याची किंमत मोजतोय” ; अमेरिकन सिनेटरचे गंभीर आरोप

US Senator Lindsey Graham। रशिया-युक्रेन युद्धाची आग पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतावर मोठा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना कडक इशाराही दिला आहे. रशियाने कीववर केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात डझनभर निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, ग्राहम यांनी,”भारत पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत मोजत आहे.” असे म्हणत पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे.
ग्राहम यांनी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना रशियाकडून तेल खरेदी करून त्यांच्या युद्धयंत्रणेला बळ दिल्याचा आणि निष्पाप नागरिकांना मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. तीन देशांचे नाव घेत त्यांनी, रशियाच्या युद्धयंत्रणेला पाठिंबा दिल्याबद्दल या देशांना परिणाम भोगावे लागतील.” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
ग्राहम यांनीसोशल मीडियावर एक पोस्ट करत हे आरोप केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “हे देश नागरिकांच्या मृत्यूसाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत.” असे म्हटले. त्यांनी असं प्रश्न देखील उपस्थित, “भारत, चीन, ब्राझील आणि इतर देश… तुमच्या खरेदीमुळे मुलांसह निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला हे तुम्हाला कसे वाटते?” असे म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहिले, “पुतिनला पाठिंबा दिल्याबद्दल भारत किंमत मोजत आहे. बाकीच्यांनाही लवकरच हे कळेल.”असे आपल्या पोस्टमधून म्हटले.

अमेरिकेचे सतत भारतावर आरोप US Senator Lindsey Graham।
दरम्यान, अमेरिका भारतावर रिफायनरी नफा कमावण्याचा आणि युक्रेन युद्धासाठी अप्रत्यक्षपणे रशियाला निधी देण्याचा आरोप करत आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, भारत ज्या पैशाने रशिया कच्चे तेल खरेदी करतो, तो पैसा रशिया अधिक शस्त्रे बनवण्यासाठी आणि युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी वापरतो. इतकेच नाही तर या आरोपांमुळे अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. तथापि, भारताने अनेक वेळा यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि हे आरोप फेटाळून लावले आहेत.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये २१ जणांचा मृत्यू US Senator Lindsey Graham।
रशियाने काल युक्रेनची राजधानी कीववर मोठा हवाई हल्ला केला. राजधानीच्या मध्यवर्ती भागात हा एक दुर्मिळ थेट हल्ला होता, ज्यामध्ये किमान २१ लोक ठार झाले आणि ४८ जण जखमी झाले. हा हल्ला अलिकडच्या आठवड्यांतील सर्वात मोठा होता. यामुळे युरोपियन युनियनच्या राजनैतिक कार्यालयांचे नुकसान झाले, हजारो खिडक्या फोडल्या आणि सुमारे १०० इमारती (शॉपिंग मॉलसह) उद्ध्वस्त झाल्या.
युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की रशियाने ३१ ड्रोन आणि डेकोयसह ५९८ क्षेपणास्त्रे डागली, ज्यापैकी बहुतेक कीवला लक्ष्य केले होते. कीव अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की १० जिल्ह्यांमधील ३३ ठिकाणी थेट हल्ले किंवा ढिगाऱ्यांचा हल्ला झाला. २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने कीवच्या मध्यभागी थेट हल्ला केलेल्या काही वेळा हा हल्ला होता.





