दरवेळी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी प्रेसिडेंशियल डिबेट होते. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात प्रेसिडेंशियल डिबेट झाले. या डिबेटमध्ये गर्भपातासह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांनी कुत्र्याबरोबर केली. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ? डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस डाव्या विचारसरणीच्या असल्याचा आरोप केला. “कमला हॅरिस यांचे वडील कम्युनिस्ट होते. कमला हॅरिस यांना त्यांनी डावी विचारसरणी शिकवली आहे. म्हणूनच पुतिन सुद्धा कमला हॅरिस यांचं समर्थन करतात” असं ट्रम्प म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘ज्यो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून कुत्र्यासारखं बाजूला काढलं’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केले. कमला हॅरिस यांनी केला पलटवार त्यांच्या या वक्तव्यानंतर कमला हॅरिस यांनी जोरदार पलटवार केला. “जग तुमच्यावर हसंत डोनाल्ड ट्रम्प. 8 कोटी लोकांनी तुम्हाला फायर केलं आणि हीच गोष्ट तुम्हाला पचत नाहीय” असं कमला हॅरिस म्हणाल्या. 90 मिनिटांच्या या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये अबॉर्शन, अर्थव्यवस्था, परराष्ट्र नीति, संसदेतील हिंसाचार सारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.