NASA News : चंद्रावर कायम तळ उभारण्याची अमेरिकेची योजना; नासाने जाहीर केली ३ टप्प्यांची रुपरेषा
चंद्राभोवती प्रदक्षिणेची योजना यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाकडून आता चंद्रावर कायमचा तळ उभारण्यासाठीच्या योजनेची घोषणा केली आहे.

NASA – चंद्राभोवती प्रदक्षिणेची योजना यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाकडून आता चंद्रावर कायमचा तळ उभारण्यासाठीच्या योजनेची घोषणा केली आहे.
तीन मोहिमांच्या टप्प्यामध्ये चंद्रावर हा कायमचा तळ उभारण्यात येणार असल्याचे नासाने म्हटले आहे. नासाचे व्यवस्थापक जरेड इसाकमन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये या २० अब्जडॉलरच्या योजनेची घोषणा केली.
या मोहिमेमध्ये चंद्रावर करण्यात येणाऱ्या प्रयोगांसाठी ल्युनर रोव्हर आणि ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. चंद्रावर राहण्यासाठी आणि धोकादायक वातावरणात काम करण्यासाठी हे प्रयोग आवश्यक असणार आहेत.
अमेरिका चंद्रावर पुन्हा जाणार आहे. मून बेस हा अमेरिकेचा आणि मानवासाठीचा पहिला आणि आणखी एक स्वर्गीय विश्वातील आऊटपोस्ट असणार आहे, असे इसाकमन यांनी म्हटले आहे.
नासाने चंद्रावर तळ उभारण्याची योजना मार्च महिन्यातच जाहीर केली आहे. त्यासाठी उचलण्यात येणाऱ्या ठोस पावलांची मंगळवारी घोषणा करण्यात आली.
नासाने २०२८ मध्ये चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्टही ठेवले आहे. मून-बेस- १ या पहिल्या टप्प्याचे नियोजन या वर्षी सप्टेंबरच्या आधी अपेक्षित आहे. त्या मोहिमेसाठी ब्लू ओरिजिनच्या ब्लू मून मार्क १ एंड्युरन्स लँडरची निवड केली आहे.
या टप्प्यात आवश्यक उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागावर कशी न्यायची याचा अभ्यास केला जाईल. लेसर रिट्रोरिफ्लेक्टिव्ह अर्रेच्या मदतीने चंद्रावर उपकरणे ठेवण्याचे नेमके ठिकाण निश्चित केले जाईल.
दुसरा टप्पा या वर्षाच्या अखेरीस असेल. त्यामध्ये १,१०० पौंडांची अंतराळ वाहून नेणाऱ्या ऍस्ट्रोलॅब फ्लिप रोव्हरची चाचणी घेतली जाईल. तर तिसरा टप्पाही याच वर्षी असेल. त्यात नासाकडून तंत्रज्ञानाची चाचणी आणि पुढील ३ वर्षांसाठीच्या चंद्रपृष्ठभागावरील कामाची तयारी केली जाणार आहे.





