खलिस्तानी दहशतवादी पन्नूवर अमेरिकेची कृपादृष्टी ; म्हणाले,’ … त्यासाठी भारताला जबाबदार धरावे…’

US On Gurupatwant Singh Pannun । खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या कथित प्रयत्नाबाबत भारतात तपास सुरू आहे. पन्नूची हत्या आपल्या एजंटमार्फत केल्याचा आरोप भारतावर होता. सध्या सुरू असलेल्या तपासाबाबत भारताकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा असल्याचा अमेरिकेने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, “वॉशिंग्टन आपली चिंता थेट भारत सरकारकडे वरिष्ठ पातळीवर मांडत आहे.”
परराष्ट्र मंत्रालयाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यावेळी पन्नू हत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “उन्हाळ्यात अमेरिकेच्या भूमीवर एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केल्याबद्दल भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला जबाबदारीची अपेक्षा आहे. आम्ही आमच्या चिंता थेट भारत सरकारला वरिष्ठ पातळीवर सांगितल्या आहेत.”
पन्नूच्या हत्येचा प्रयत्न कॅनडात झाला, अमेरिका काय म्हणाली? US On Gurupatwant Singh Pannun ।
त्याचवेळी कॅनडातही गुरुपतवंत पन्नू यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. वेदांत पटेल यांनाही मीडियाने यासंदर्भात विचारले, कॅनडात पन्नूच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. उपप्रवक्ते वेदांत म्हणाले, “कॅनडातून ही बातमी आली आहे. ही घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घडली आहे.”असे त्यांनी म्हटले.
पन्नू हत्येप्रकरणी भारतीय नागरिकाला अटक US On Gurupatwant Singh Pannun ।
भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. भारत सरकारने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. याआधी जूनमध्ये निकुल गुप्ता याला तपासासाठी चेक रिपब्लिकमधून अमेरिकेला पाठवण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान त्याने ‘दोषी नाही’ अशी बाजू मांडली होती. निखिल गुप्ता हा भारत सरकारचा सहयोगी आहे आणि त्याने आणि इतरांनी न्यूयॉर्क शहरात पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे.





