#RussiaUkraineWar : रशियाकडून पुन्हा एकदा आण्विक संघर्षाचा इशारा

जिनिव्हा – युक्रेनबरोबरच्या संघर्षाच्या अनुषंगाने बोलताना रशियाने पुन्हा एकदा आण्विक संघर्षाचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या निशस्त्रीकरण विषयक परिषदेमध्ये बोलताना रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्जी रायबकोव्ह यांनी हा इशारा दिला आहे.
अमेरिका आणि अन्य पाश्चात्य सहकारी देशांनी युक्रेनविरूद्धच्या संघर्षात रशियाचा पराभव करण्याचे उद्दिष्ट उघडपणे जाहीर केले आहे. या देशांनी आंतरराष्ट्रीय करारांची बांधिलकी पाळली नाही आणि युक्रेनविरोधात युद्धात भाग घेतला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे ते म्हणाले.
अमेरिका आणि “नाटो’च्या धोरणामुळे आगीत तेल ओतले जाते आहे. यातूनच लष्करी ताकद वाढवून संघर्ष अधिक तीव्र होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर आण्विक संघर्ष भडकण्याचा आणि त्यानंतरच्या भीषण नरसंहाराचा धोकाही पुढे येऊ शकतो, असे देखील रायबकोव्ह (Sergei Ryabkov) यांनी म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/jill-biden-says-joe-biden-to-run-for-president-again-in-2024/
अमेरिकेबरोबरच्या “स्टार्ट’ या अण्वस्त्र निरीक्षक आणि नियंत्रण करारातून माघार घेण्याच्या पुतीन यांच्या निर्णयाचे त्यांनी समर्थनदेखील केले. अण्वस्त्रांचे प्रमाण कायम राखण्यासाठी अमेरिकेबरोबर करण्यात आलेल्या “न्यू स्टार्ट’करारातून माघार घेण्याचा निर्णय पुतीन यांनी गेल्या आठवड्यातच माघार घेतला आहे.





