Rape case in Las Vegas | रोनाल्डोबाबत लवकरच निर्णय
Updated On:

वॉशिंग्टन – स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध सुरु असलेला बलात्काराचा खटला निकाली काढण्याची शिफारस अमेरिकन न्यायाधीशाने केली आहे.
2009 मध्ये लॉस वेगस स्थित एका हॉटेलमध्ये माजी मॉडेल कॅथरीत मायोर्गा हिने रोनाल्डोवर बलात्काराचे आरोप केले होते. मात्र या आरोपांचे ख्रिस्तियानो रोनाल्डो याने खंडन केले आहे. जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाल्याचे रोनाल्डोचे म्हणणे आहे.
असे असले तरी कॅथरीन मायोर्गा हिने रोनाल्डो विरुद्ध तक्रार दाखल केली होती. मायोर्गाने 2010मध्ये न्यायालयाबाहेर प्रकरण सोडवल्याचा दावाही केला होता. रोनाल्डोने मायोर्गाला जवळपास 2.81 कोटी रुपये दिले होते.





