US-Israel-Iran War : इराणमधील युद्ध तात्काळ थांबवा; चीनने अमेरिकेला खडसावले
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध (US-Israel-Iran War) थांबवण्यात यावे. यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असे चीनने म्हटले आहे.

US-Israel-Iran War : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध (US-Israel-Iran War) थांबवण्यात यावे. यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असे चीनने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मूझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी चीन सोडून इतर देशांना या युद्धामध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनाला उत्तर देताना चीनने अमेरिकेला चक्क खडसावले आहे.
इतर देशांनी ट्रम्प यांना सककारात्मक प्रतिसाद दिलेला नसताना चीनने (US-Israel-Iran War) मात्र ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ट्रम्प या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये चीनला जाणार आहेत. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या या नियोजित दौऱ्याबाबत फेरविचार केला जात असल्याचेही चीनने म्हटले आहे. परिणामी ट्रम्प यांना चीनचा दौरा एकतर लांबणीवर टाकावा लागू शकतो अथवा पुर्णपणे रद्द करावा लागू शकतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि लगतच्या पाण्यातील अलिकडच्या तणावामुळे वस्तू आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे प्रादेशिक शांतता आणि जागतिक स्थिरतेला हानी पोहोचली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी माध्यमांबरोबरच्या वार्तालापामध्ये सांगितले.
तसेच तणाव आणखी वाढू नये आणि प्रादेशिक अशांततेचा जागतिक आर्थिक विकासावर (US-Israel-Iran War) मोठा परिणाम होऊ नये म्हणून चीनने सर्व बाजूंना लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले असल्याचेही लिन म्हणाले. ट्रम्प यांच्या चीन भेटीबाबत चीन आणि अमेरिका एकमेकांशी संपर्कात आहेत. चीन-अमेरिका संबंधांमध्ये दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांची राजनैतिक कूटनीति अविभाज्य धोरणात्मक भूमिका बजावते, असेही त्यांनी सांगितले.






