US-Iran War: “हो, मी पाकिस्तानला जाईन,आसिम मुनीर..” ; ट्रम्प यांनी पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव का केला?
US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानवर अथकपणे टीका केली होती.

US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानवर अथकपणे टीका केली होती. मात्र आता ते आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानची भरभरून प्रशंसा करताना दिसत आहेत.
पाकिस्तानमध्ये इराणसोबत सुमारे सात आठवड्यांच्या संघर्षानंतर शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणसोबतच्या कराराबाबत एक धाडसी दावा केला आहे. त्यांनी, “जर इस्लामाबादमध्ये इराणसोबत करार झाला, तर ते पाकिस्तानला भेट देतील.” असे म्हटले आहे.
“मी पाकिस्तानला जाऊ शकतो” US-Iran War
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, “पाकिस्तानला ते खूप आवडतात आणि तेथील अधिकाऱ्यांची इच्छा आहे की त्यांनी पाकिस्तानला भेट द्यावी. ” असे सांगितले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, “जर अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये शांतता करार निश्चित झाला, तर ते इस्लामाबादला भेट देण्याचा विचार करतील.” या विधानावरून इराणसोबतच्या शांतता करारात इस्लामाबादच्या संभाव्य भूमिकेकडे संकेत मिळतो.
ट्रम्प काय म्हणाले?
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी, “जर इस्लामाबादमध्ये करार झाला, तर मी जाऊ शकतो. त्यांची (पाकिस्तानची) इच्छा आहे की मी जावे.” असे म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुलभ करण्यात पाकिस्तानच्या भूमिकेची प्रशंसा केली आणि त्यांच्या सहभागाचे वर्णन उत्कृष्ट असे केले.
ट्रम्प यांनी शहबाज शरीफ आणि मुनीर यांची प्रशंसा करत म्हटले, “फील्ड मार्शल खूप चांगले आहेत, शहबाज शरीफ देखील खूप चांगले आहेत, त्यामुळे कदाचित मी जाईन.” US-Iran War
“इराणसोबत लवकरच करार होऊ शकतो” US-Iran War:
ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचे योगदान चांगले राहिले आहे. इतकेच नाही तर, इराणसोबत लवकरच करार होऊ शकतो असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, “मला वाटते की सध्या खूप चांगली चर्चा सुरू आहे. जर करार झाला, तर त्याची घोषणा लवकरच केली जाईल. यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी होईल, आपल्याला तेल मिळेल आणि सर्व काही चांगले होईल. मला वाटते की तेलाच्या किमती पूर्वीपेक्षाही कमी होतील.”
इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी काल तेहरानमध्ये इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांची भेट घेतली. अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य करार घडवून आणण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.






