US Iran Peace Deal: “होर्मुज पुन्हा खुले होणार!” ; ट्रम्पांच्या दाव्याने खळबळ, इराणने दिले थेट उत्तर
US Iran Peace Deal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणसोबतचा शांतता करार जवळपास अंतिम टप्प्यात असून, केवळ अंतिम औपचारिकतांवर चर्चा सुरू आहे" असा दावा त्यांनी केला आहे.

US Iran Peace Deal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणसोबतचा शांतता करार जवळपास अंतिम टप्प्यात असून, केवळ अंतिम औपचारिकतांवर चर्चा सुरू आहे” असा दावा त्यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या मते,”हा करार तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा शेवट करण्याचा मार्ग मोकळा करू शकतो.” असे त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी, “अमेरिका, इराण आणि इतर अनेक देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींनंतर हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.”असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, “त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशीही संवाद साधला, जो खूप सकारात्मक होता.”असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “मी पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्रपणे बोललो, जे खूप चांगले होते. कराराच्या अंतिम मुद्द्यांवर चर्चा सुरू असून ते लवकरच जाहीर केले जातील.”
होर्मुझवर इराणचे मोठे विधान US Iran Peace Deal:
ट्रम्प यांनी, “या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाईल. तथापि, इराणने हा दावा फेटाळून लावला असून, त्यावर आपले नियंत्रण कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. वृत्तानुसार, इराणने केवळ युद्धापूर्वीच्या संख्येइतक्याच जहाजांना परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे, परंतु याला पूर्णपणे मुक्त मार्ग मानले जाऊ शकत नाही.
Dr. Baqaei, MFA SpoX: The issue of the Strait of Hormuz has nothing to do with the United States
A mechanism must be defined between us and Oman as coastal countries. We have had several meetings with the Omani side on this matter.
In this regard we are cooperating with… pic.twitter.com/Ic8o6V0AOn
— Iran In Hyderabad (@IraninHyderabad) May 24, 2026
१४-कलमी शांतता करार
ट्रम्प यांनी याला सामंजस्य करार म्हटले आहे, ज्यात शांततेशी संबंधित अनेक मुद्दे समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, अमेरिका, इराण आणि इतर देशांच्या मंजुरीनंतरच हा करार अंतिम केला जाईल. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चर्चेचा मुख्य भर युद्ध संपवण्यावर आहे. यामध्ये सागरी हल्ले रोखणे आणि काही निर्बंध शिथिल करणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
अणुकार्यक्रमावर अद्याप चर्चा नाही
ट्रम्प यांच्या शांतता संदेशात इराणच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ट्रम्प यांच्या विधानाला “प्रचारकी” म्हटले आहे आणि सांगितले की अणुकार्यक्रमाबाबत अद्याप कोणताही करार किंवा वचनबद्धता झालेली नाही.
पाकिस्तानने आशा व्यक्त केली US Iran Peace Deal:
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, “त्यांना आशा आहे की अमेरिका-इराण चर्चेची पुढील फेरी लवकरच पाकिस्तानात आयोजित केली जाऊ शकते.” त्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांना असाधारण म्हटले.
I congratulate President Donald Trump on his extraordinary efforts to pursue peace and for holding a very useful and productive telephone call earlier today, with the leaders of Saudi Arabia, Qatar, Turkiye, Egypt, the UAE, Jordan and Pakistan. Field Marshal Syed Asim Munir…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) May 24, 2026
अणुकार्यक्रमावर अद्याप चर्चा नाही
ट्रम्प यांच्या शांतता संदेशात इराणच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) ट्रम्प यांच्या वक्तव्याला ‘प्रचार’ म्हटले असून, अणुकार्यक्रमाबाबत अद्याप कोणताही करार किंवा वचनबद्धता झालेली नाही, असेही म्हटले आहे.
पाकिस्तानने आशा व्यक्त केली
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, अमेरिका-इराण चर्चेची पुढील फेरी लवकरच पाकिस्तानात होऊ शकेल अशी त्यांना आशा आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांना ‘असामान्य’ म्हटले.





