US-Iran Ceasefire: पाक पुन्हा तोंडघशी ! नेतन्याहू यांनी डोळे वटारताच ‘ते’ ट्विट करावे लागले डिलीट
US-Iran Ceasefire: इराण-इस्रायल शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचं दिसतंय.

US-Iran Ceasefire: इराण-इस्रायल शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचं दिसतंय. कारण पाकिस्तानने केलेल्या एका वक्तव्याने इस्रायल चांगलाच संतप्त झाला आहे. इस्रायलने आता पाकिस्तानला तीव्र शब्दांत फटकारले आहे.
एका अलीकडील वक्तव्यामुळे पाकिस्तान सध्या टीकेचा धनी झाला आहे. हे खडेबोल संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे करण्यात आले आहेत, ज्यात त्यांनी इस्रायलला ‘कर्करोग’ म्हटले होते.
इस्रायलने पाकिस्तानला का फटकारले ? US-Iran Ceasefire:
इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेपूर्वी पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यामुळे या वादात आणखी तेल ओतले गेले आहे. एका पोस्टमध्ये, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलवर टीका करत त्याला दुष्ट आणि मानवतेवरील शाप म्हटले आहे.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी, “पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू असताना, इस्रायल लेबनॉनमध्ये नरसंहार करत आहे. आधी गाझामध्ये, मग इराणमध्ये आणि आता लेबनॉनमध्ये निष्पाप लोकांची हत्या केली जात आहे. ज्यांनी पॅलेस्टिनी भूमीवर हा कर्करोगग्रस्त देश स्थापन केला आहे, त्यांनी या ज्यूंना संपवण्यासाठी काम केले पाहिजे.” असे म्हणत वादग्रस्त पोस्ट केली. ज्यामुळे इस्रायल चांगलाच संतापला.
नेतन्याहू यांनी ख्वाजा आसिफ यांना सुनावले खडेबोल
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने आसिफ यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, पाकिस्तानने इस्रायलला उद्ध्वस्त करण्याचे केलेले आवाहन निंदनीय असल्याचे म्हटले आहे. हे वक्तव्य असहनीय आहे, विशेषतः अशा सरकारकडून जे स्वतःला एक निष्पक्ष शांतता मध्यस्थ म्हणवते.” असे म्हटले. इस्रायलच्या या वक्तव्यानंतर असिफ यांना त्यांची पोस्ट डिलिट करावी लागली आहे.
दरम्यान, इराणची सरकारी वृत्तसंस्था, तस्निम न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, जोपर्यंत इस्रायल लेबनॉनमधील लष्करी हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबतची चर्चा स्थगित केली जाईल
इस्रायलचा पाकिस्तानवर विश्वास नाही US-Iran Ceasefire:
इस्रायलच्या परराष्ट्र धोरणात हा एक मोठा बदल आहे. इस्रायली सरकारने पाकिस्तानवर जाहीरपणे हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, भारतातील इस्रायली राजदूतांनी, “इस्रायलचा पाकिस्तानवर विश्वास नाही आणि गाझामधील ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलात पाकिस्तानी सैन्याला सामील होऊ देणार नाही.” असे म्हटले होते.







